Bhandara Crime News  saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime News : भंडा-यात दाेन कुटुंबात वाद; एकाची हत्या, दाेघे जखमी

या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती भंडारा पाेलीसांनी दिली.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara Crime News : भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथे लोखंडी रॉडने वार करत एकाचा मृत्यू तर दोन जखमी झाले. या घटनेतील जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पाेलीसांनी संशयितास अटक केली आहे. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार संशयित अक्षय शाहू व मृतक यांचा घर जवळ जवळ आहे. संशयिताच्या पाच वर्षाच्या मुलाने मृतक शालिकराम शहारे याला चप्पल फेकून मारली. त्यात शालीकराम यांनी त्या मुलाला गालावर थापड मारली.

त्यानंतर अक्षय शाहू आणि शालिकराम शहारे यांच्यात वाद झाला. त्यातूनच शाहूने लोखंडी रॉडने शालिकराम यांच्यावर वार केला. त्यावेळी शालिकराम यांचा मुलागा किशोर, पत्नी या तेथे आल्या. त्यांना देखील शाहूकडून मारहाण झाली.

या घटनेत शालिकराम शहारे यांचा जागीच मृत्यू झाला तसेच किशोर व शालिकराम यांची पत्नी जखमी झाले. या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पाेलीसांनी संशयितास अटक केली तर जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अशोक बागुल (उपविभागीय पोलिस अधिकारी, भंडारा) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT