Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : हायड्रोलिक दांड्याचा नट बसवताना ट्रॉली अंगावर कोसळली; मजुराचा मृत्यू

Bhandara : बेटाळा येथील लोकेश भाकरू बुद्धे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. लोकेश वैनगंगा येथील बेटाळा रेती घाटावर ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्यासाठी गेला होता. साथीदारांसोबत त्याने ट्रॉली भरली होती

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: रेतीने भरलेल्या ट्रॉलीच्या हायड्रोलिक दांड्यातून ऑइल लीक होत होते. या हायड्रॉलिक पद्धतीच्या ट्रॉलीचा नट कसत असताना अचानक ट्रॉली अंगावर कोसळली. यामुळे रेतीने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. मृत तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील बेटाळा येथील लोकेश भाकरू बुद्धे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान लोकेश हा वैनगंगा येथील बेटाळा रेती घाटावर ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्यासाठी गेला होता. सोबतच्या साथीदारांसोबत त्याने ट्रॅक्टरची ट्रॉली भरली होती. नदीपात्रातील ट्रॅक्टरमध्ये पूर्णपणे रेती भरून झाली. यावेळी ट्रॉलीच्या हायड्रोलिकमधून ऑइल येत होते. त्यामुळे लोकेश याने हायड्रोलिक वर करत ऑइल कुठून लिकेज होत आहे, हे बघायला तो गेला. 

अचानक ट्रॉली खाली कोसळली 

यावेळी त्याने हायड्रोलिक बघितल्यावर तेथील लोखंडी नट पान्ह्याद्वारे कसायला सुरुवात केली. नट फिरवत असताना अचानकपणे हायड्रोलिकची ट्रॉली खाली कोसळली. यात ट्रॉलीच्या खालच्या भागात लोकेश हा पूर्णपणे सापडला. हायड्रोलिकच्या जागेवर त्याची मान व खांदा सापडला गेल्याने त्याला तेथून निघता आले नाही. यातच त्याचा जागेवरच मृत्यू झाला. यामुळे घटनास्थळी प्रचंड खळबळ उडाली होती. 

ग्रामस्थ झाले जमा 

दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. ट्रॅक्टरमध्ये सापडलेल्या लोकेश बुधे याला बाहेर काढण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर लोकेशच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना देण्यात आल्यानंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहरात आजपासून पाणी पुरवठ्यात 15 टक्के पाणी कपात

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

पगडीने तोंड दाबलं, हाताची नस कापली, गळा दाबून 7 वर्षांच्या निरागस मुलाची हत्या, भद्रकालीच्या जंगलात नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, आता १४ आमदार फुटणार? शिंदेंच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT