Bhandara Latest News Saam Tv
महाराष्ट्र

नको ते धाडस केलं, जीवावर बेतलं; मोटरसायकलसह दोघे पुरात गेले वाहून

सारांश सुखदेवे नामक तरुण पाण्यात वाहून गेला.

अभिजीत घोरमारे

भंडारा : सासुरवाडीहून मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. सदरील घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील नाल्यावर गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यापैकी एक जण बचावला तर दुसरा बेपत्ता आहे, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आज पहाटेपासून शोधकार्य सुरू केले. (Bhandara Marathi News)

सारांश मुन्नालाल सुखदेवे (वय २७ वर्ष) रा. खैरलांजी जि. बालाघाट (मध्यप्रदेश) असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर रवी सेवक टेकाम (वय ३१ वर्ष) रा. खैरलांजी जि. बालाघाट असे बचावलेल्या तरूणाचे नाव आहे. माहितीनुसार तुमसर तालुक्यातील बाळापूर हमेशा येथे रवी टेकाम या तरुणाची सासूरवाडी आहे. हे दोघेही तरुण सासुरवाडीला आले होते.

दरम्यान, रात्री परत चिखला मार्गे ते मध्यप्रदेशातील खैरलांजीकडे जात होते. यादरम्यान, कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील पुलावरून जात असताना अंधारामुळे पुलावरून पाणी असल्याचे त्यांना दिसले नाही. त्यामुळे दोघेही मोटरसायकलसह पुलावरून पाण्यात पडले. यापैकी रवी टकाम काही वेळात सुखरूप बाहेर आला. (Bhandara Latest News)

सारांश सुखदेवे पाण्यात वाहून गेला. रवीने या घटनेची माहिती तातडीने सासुरवाडीच्या मंडळींना दिली. दरम्यान, त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोलिसांना बचावकार्यात अडथळा आला. आज सकाळपासूनच पोलीस बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध घेत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT