Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: पुलावरुन ३० फुट खोल नदीत कोसळला ट्रॅक्‍टर; एकाचा जागीच मृत्‍यू, दोघे गंभीर जखमी

पुलावरुन ३० फुट खोल नदीत कोसळला ट्रॅक्‍टर; एकाचा जागीच मृत्‍यू, दोघे गंभीर जखमी

अभिजीत घोरमारे

भंडारा : शेतातील माल घेऊन जाणारा ट्रॅक्टरला ट्रकने साइड न दिल्याने ट्रॅक्टर सरळ पुलावरुन ३० फुट चुलबन्द नदीत कोसळले. सदर घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदुर येथे पवनी- लाखांदुर मार्गावरिल शिवमंदीर जवळील (Accident) पुलावर घडली. यात ट्रॅक्टरवरील एक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. (Breaking Marathi News)

लाखांदुर येथील शेतकरी राष्ट्रपाल ठाकरे यांनी आपल्या शेतातील कडधान्य बाजार समिती येथे नेण्याकरिता ट्रॅक्टरमध्ये भरून सहकारी अन्ना पारधी व राध्येश्याम ढोरे यांच्यासोबत ट्रॅक्टरवर निघाले. लाखांदुर- पवनी मार्गावरील चुलबन्द नदीवरील पुलावरुन समोर येणारा भरधाव ट्रकने साइड न दिल्याने ट्रॅक्टर अपघात होण्यापासून वाचविणाच्या नादात ट्रैक्टर सरळ ३० फुट पुलावरुन आदळला.

ट्रॅक्‍टरवर बसलेला अण्णा पारधी (वय ५०) यांच्या जागीच मृत्यु झाला. तर राष्ट्रपाल ठाकरे (वय ५०) यांच्या पाय मोडला असून राध्येश्याम ढोरे (वय ४४) हेही गंभीर जखमी झाले. अपघात होताच लोकांनी एकच धाव घटनास्थळी घेतली. ट्रॅक्टरमध्ये फसलेल्या लोकांना बाहेर काढत लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींवर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिस घटनास्‍थळी दाखल झाली असून पंचनामा सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

Diva - Chiplun Railway : कोकणवासीयांठी आनंदवार्ता! दिवा- चिपळूण विशेष मेमू धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार? वाचा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी १८,००० वरुन ७२,००० होणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?

Petrol-Diesel Price: खरंच पेट्रोल-डिझेल २५ ते २८ रुपयांनी महागणार? आज तुमच्या शहरातील दर किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT