Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : सुगंधित तंबाखूची तस्करी रोखली; ८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त, दोघांना घेतले ताब्यात

Bhandara News : उपविभागीय पोलिस विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर साकोली तालुक्यातील सानगडी येथील नवेगाव बांध फाट्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: सुगंधित सुपारी, तंबाखू विक्री व वाहतुकीस बंदी असताना याची सर्रासपणे तस्करी केली जात असते. अशाच प्रकारे सुगंधित तंबाखूची तस्करी करणारे वाहन उपविभागीय पोलिस विभागाच्या पथकाने पाठलाग करत पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

उपविभागीय पोलिस विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर साकोली तालुक्यातील (Bhandara) सानगडी येथील नवेगाव बांध फाट्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. गाडी मध्ये सुगंधीत तंबाखू नवेगाव/बांध कडून सानगडी कडे येत आहे, अशी माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कार आली असता सदरची गाडी थांबवून गाडीची तपासणी केली. गाडीच्या डिक्कीमध्ये सुगंधित तंबाखूचे ३० बोरी माल मिळाला. हा (Police) पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गाडी मालक व चालकाविरोधात गुन्हा दाखल 

पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन ८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गाडी चालक मुनेश्वर ताराम (वय ३२, रा.नवेगाव/बांध) व मालक देवेश पटेल (वय ४०, नवेगाव/बांध) यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन साकोली येथे गुन्हा दाखल करून माल आणि गाडी पोलीस स्टेशन जमा केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT