Ravanwadi Tourist Spot Saam tv
महाराष्ट्र

Ravanwadi Tourist Spot : रावणवाडी पर्यटनस्थळ दोन दिवस पर्यटनासाठी बंद; पर्यटकांचा होणार हिरमोड

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर साजरा करण्याकरिता तरुणाईंकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येतो धुमाकूळ घालणाऱ्या आणि तळीरामांचा वेळीच बंदोबस्त करता यावा

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : नववर्षाचे स्वागत करताना काही जण पर्यटन करण्यासाठी जात असतात. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी येथे देखील पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र निसर्ग सानिध्यात असलेल्या रावणवाडी येथील पर्यटनस्थळ दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांचा हिरमोड होणार आहे. 

भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर साजरा करण्याकरिता तरुणाईंकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येतो. यावेळी धुमाकूळ घालणाऱ्या आणि तळीरामांचा वेळीच बंदोबस्त करता यावा; यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील सतराही पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याच्यामुळे थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

रावणवाडी येथे होते गर्दी 

दरम्यान काहीजण पार्टीचे नियोजन करत असतात. तर काही जण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी या पर्यटनस्थळी गर्दी होत असते. इतर दिवसांमध्ये देखील याठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. तर ३१ डिसेंबर व १ जानेवारीला अधिक पर्यटक येथे येत फिरायला येत असल्याने अधिक गर्दी होत असते. 

पशु पक्षांना धोका होण्याची शक्यता 

दरम्यान निसर्गाच्या मुक्त वातावरणाची उधळण करण्यासाठी रावणवाडी इथं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, पर्यटकांकडून निसर्ग आणि त्यातील पशुपक्ष्यांना धोका निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वन विभागांकडून वर्तविण्यात आली आहे. या अनुषंगाने हे पर्यटनस्थळ ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला बंद ठेवण्यात येत आहे. यानंतर मात्र हे ठिकाण खुले करण्यात येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT