Bhandara zp 
महाराष्ट्र

अतिरिक्‍त सीईओंच्‍या दालनातच केले विषप्राशन; भंडारा जिल्हा परिषदेतील प्रकार

अतिरिक्‍त सीईओंच्‍या दालनातच केले विषप्राशन; भंडारा जिल्हा परिषदेतील प्रकार

अभिजीत घोरमारे

भंडारा : विविध मागण्या घेऊन चर्चा करायला गेलेल्या एम्बुलंस चालकाने चक्क अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातच विष प्राशन करुन आत्महत्येच्या प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. सदर प्रकार भंडारा जिल्हा परिषदेत घडला आहे. (bhandara-news-Poisoning-done-in-the-halls-of-additional-CEOs-bandara-zilha-parishad)

जितेंद्र डोंगरे (वय ५२) हे पहेला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एम्बुलेंस चालक आहे. मागील १६ वर्षांपासुन ते भंडारा जिल्ह्यात एसकॉम कंपनीकड़ून कंत्राटी पद्धतीने चालक आहेत. कंपनीकडून सतत शोषण, कामाचे तास अनिश्‍चीत, वेळेवर वेतन नाही आदी समस्या सर्वच चालकांना भेडसावत आहे. कंत्राटी पद्धतीने १६ वर्ष कार्यरत असल्याने आता ‘एनआरएचएम’मध्ये समाविष्ठ करण्याची मागणी गेल्‍या अनेक वर्षापासून सूरु आहे.

बैठकीत तोडगा न निघाल्याने उचलेले पाऊल

आपल्‍या मागणी घेऊन ते आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठकीस गेले होते. बैठकीत कोणताही तोड़गा न निघाल्याने त्‍यांनी नैराश्यातून त्यांनी उंदीर मारण्याची औषध खाण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने विषाची पुडी हिस्कावल्याने चालकाचे प्राण वाचले आहे. अखेर त्यांना तोडगा काढण्याचे आश्वसान देत शांत करण्यात आले. यावेळी मात्र काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

SCROLL FOR NEXT