Bhandara Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Heavy Rain : सततच्या पाण्यामुळे धान पिक खराब होण्याच्या मार्गावर; शेतीला आले तलावाचे स्वरूप

Bhandara Rain : मुसळधार पावसाने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. तर अनेक मार्ग बंद असून गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : विदर्भात मुसळधार पाऊस होत आहे. भंडारा जिल्ह्यात देखील सलग तिन दिवसांपासून मुसळधार पावसाच्या कोसळत आहे. यामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाची संततधार पडत असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतांमध्ये तलावाचे स्वरूप आले असून पाण्यामुळे धन पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूरसह परिसरात पावसाने हाहाकार माजविला आहे. दरम्यान हवामान विभागाकडून भंडारा (Bhandara) जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सलग पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून देखील पावसाची संततधार (Heavy Rain) सुरूच आहे. यामुळे अनेक सखल भागात तसेच रस्त्यांवर देखील पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

पिकांचे नुकसान

मुसळधार पावसाने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. तर अनेक मार्ग बंद असून गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले. याचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. नुकतीच शेतकऱ्यांनी धान पिक रोवणी केली. मात्र संपुर्ण धान पिक पाण्याखाली गेल्याने तलावाचे स्वरूप आहे असून पिक खराब होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय काकडे यांची होणारी पत्रकार परिषद रद्द

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! रात्री भात खाण्याऐवजी खा 'हा' 1 पदार्थ; वजन राहील नियंत्रणात

BJP Politics: भाजपला मोठा धक्का! युवा नेता थेट दुसरा पक्ष काढणार; राजकीय वर्तुळात खळबळ

Nandurbar : महाराष्ट्रातील दुर्गम पाड्यावर पहिल्यांदाच चमत्कार घडला! गावकऱ्यांसह लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागले

SCROLL FOR NEXT