Bhandara Mama Lake Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Mama Lake : भंडारा जिल्ह्यातील मामा तलाव मोजतोय अखेरच्या घटका; अतिक्रमण, देखभाल दुरुस्तीचा अभाव

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. या तलावांमुळे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मात्र त्यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने तलावांची समस्या बिकट झाली आहे

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: तलावाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात १ हजार १५४ मामा तलावाची संख्या आहे. परंतू वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जिल्ह्यातील मामा तलावांची स्थिती दयनीय झाली आहे. अतिक्रमण देखभाल दुरुस्तीचा अभाव यामुळे जिल्ह्यातील अनेक तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. पुरेसा निधी मिळत नसल्याने स्थिती गंभीर आहे. 

भंडारा जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. या तलावांमुळे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मात्र त्यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने तलावांची समस्या बिकट झाली आहे. अतिक्रमण व साठलेल्या गाळामुळे तसेच नादुरुस्त पाळ व लिकेज गेटमुळे अनेक तलावांची सिंचन क्षमता निम्म्यावर आली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

काही तलावांची सिंचन क्षमता वाढली 

जलयुक्त शिवारामुळे काहीसे रुपडे पालटले आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील मामा तलावाचे खोलीकरण, पाळी बांधणे, कालव्यांची दुरुस्ती, गेट दुरुस्ती, पाट दुरुस्ती आदींसाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने मागील तीन वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून मोठा निधी खर्च केला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. काही मामा तलावाचे रुपडे पालटून तलावांची सिंचन क्षमता वाढली. परंतू, अन्य तलाव अद्याप दुर्लक्षित आहेत. 

अनेक गावात दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा 

यावर्षी जलयुक्त शिवार योजना टप्पा क्र. २ अंतर्गत जिल्ह्यातील १०० गावांची निवड करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून विविध कामे करण्यात आली. त्यामुळे तलाव दुरुस्तीच्या कामांना गती मिळाली. परंतु अद्याप अनेक तलाव दुरुस्तीसाठी निधीच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे दुरुस्ती अभावी या तलावांची स्थिती दयनीय झाली असून हे तलाव अखेरच्या घटक मोजत असल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT