Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : हीट ॲण्ड रनचा थरार; भरधाव कारची तिघांना धडक, काही अंतरावर कार थांबली; अन्...

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये आज दुपारच्या सुमारास हा हीट अँड रनचा थरार घडला आहे. अपघातात सिहोराकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने दुचाकीस्वारासह व एक मुलगी व अन्य एकाला धडक दिली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: सुसाट वेगाने आलेल्या कार चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्यांना धडक देत उडवत गेल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेत तीन जणांना उडविले असून यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेतील कार चालकांना परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये आज दुपारच्या सुमारास हा हीट अँड रनचा थरार घडला आहे. या अपघातात सिहोरा कडून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने दुचाकीस्वारासह व एक मुलगी व अन्य एकाला धडक दिली आहे. त्यात दोघेजण जखमी झाले. जखमींमध्ये एका मुलीचा समावेश आहे. सदरचा अपघात तुमसर येथील बावनकर चौकाजवळ घडला. यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली होती. 

विरुद्ध दिशेने आली भरधाव कार 

दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेली कार ही विरुद्ध दिशेने भरधाव येत होती. यावेळी दुचाकी चालक राधेश्याम मलेवार (वय ५०, रा. बहेवाडा) यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक देत उडविले. यानंतर बावनकर चौकाजवळ उभ्या असलेल्या वैष्णवी राजकुमार भिवगडे (वय १५, रा. तुमसर) या युवतीला देखील धडक दिली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. हा थरार सुरू असताना एकच धावपळ माजली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला थांबली. 

मोठा अनर्थ टळला 

दरम्यान रविवार असल्याने शहरातील रस्त्यावर फारसी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दोघांना धडक दिल्यानंतर उपस्थित काही नागरिकांनी कार चालकाला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारसह कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT