Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : एकाच गाडीला दोन क्रमांकाच्या नंबर प्लेट; भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डीनच्या सेवेत आहे गाडी

Bhandara News :: वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाहनावर दोन वेगवेगळ्या क्रमांकाची नंबर प्लेट लावून ते वाहन शहरात फिरत असेल तर, अशा वाहनावर आतापर्यंत आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई का नाही

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: एकाचं क्रमांकाच्या नंबर प्लेट्स दोन वाहनांना असल्याचे पाहण्यास मिळते. तसेच गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट्सही बघायला मिळतात. मात्र, भंडाऱ्यात एकाचं वाहनाला मागं आणि पुढे अशा दोन वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट्स बघायला मिळाल्या आहेत. मुख्य म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गाडीलाच या नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे. 

आरटीओकडून पासिंग झाल्यानंतर वाहनांना नंबर प्लेट लावण्यात येत असतात. यात शासकीय वाहने असली तर नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करत नंबर प्लेट लावल्या जात असतात. अशात भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गाडीलाच दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे. दोन वेगवेगळ्या क्रमांकाची ही गाडी भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनच्या सेवेत आहे. 

मागे- पुढे वेगवेगळे नंबर 

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनच्या कार्यालयाजवळ हि गाडी लावण्यात आलेली आहे. या गाडीवर MH 36 AB 7474 ही नंबर असलेली प्लेट वाहनाच्या मागील भागात आहे. तर, MH 36 AB 4747 हा नंबर असलेली प्लेट वाहनाच्या पुढील भागात लावलेली असून वाहनाच्या मागील भागाच्या काचेवर महाराष्ट्र शासन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा असा कागदी फलक लावलेला आहे. 

गाडीच्या व्हिडीओ झाला व्हायरल 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाहनावर दोन वेगवेगळ्या क्रमांकाची नंबर प्लेट लावून ते वाहन शहरात फिरत असेल तर, अशा वाहनावर आतापर्यंत आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान सामान्य रुग्णालयाच्या पोर्चमध्ये हे वाहन बिनदिक्कत उभं असल्याचा व्हिडिओ आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमधील ध्वजारोहण आदित्य तटकरेंच्या हस्ते होणार

Nashik News: शिंदे गटाच्या बैठकीत तुफान राडा, पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडत शिवीगाळ; पाहा VIDEO

INDIA Alliance Protest: विरोधकांच्या मोर्चादरम्यान महिला खासदार बॅरिगेट्सवर चढल्या, घोषणाबाजी करताना दोघी चक्कर येऊन पडल्या

Radhakrishna Vikhe Patil : केवळ आरोप करून आरक्षण मिळणार आहे का? मंत्री विखे पाटील यांचा जरांगे पाटील यांना सवाल

Dashavatara: बाप-मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये; 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT