Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : बस चालक व एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल; साकोली आगारातील प्रकार, व्हिडिओ झाला व्हायरल

Bhandara News : चालक व वाहन परीक्षक यांच्यातील वाद व मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार साकोली बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर घडला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या लावण्यावरून चालक- वाहक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नेहमीच वाद होत असतात. अशाच प्रकारे बस फेरीवर चालकाच्या कर्तव्याची कामगिरी क्रमानुसार लावण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादातून एसटी अधिकारी आणि चालकामध्ये चांगलीच फ्री स्टाईल झाली. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या साकोली आगारात घडला. 

भंडारा जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या (MSRTC) साकोली आगारातील पंकज काटनकर असं चालकाचं नावं असून मारहाण करणारे प्रदीप करंजेकर असं अधिकाऱ्याचं नाव असून ते वाहन परीक्षक आहेत. चालक व वाहन परीक्षक यांच्यातील वाद व मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार साकोली बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर घडला. बस फेरीवर चालकाच्या कर्तव्याची कामगिरी क्रमानुसार लावण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाबद्दल (Bhandara) अद्याप कुणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. 

व्हिडीओ झाला व्हायरल 

बस चालकाच्या छातीवर बसून त्याला वाहन परीक्षक करंजेकर हे अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करीत होते. याचा संपूर्ण व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर आली. मात्र याबाबत कोणाकडूनही पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलांसाठी मोफत बससेवा, तरुणांना मोफत टॅबलेट; मुख्यमंत्र्यांचे 6 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये लेटर वॉर

मराठी सक्तीच्याविरोधात रिक्षा-टॅक्सीचालकांची हायकोर्टात धाव; निर्णय स्थगितीची मागणी

Kalyan Tourism : एक दिवसाची भन्नाट ट्रिप! फिरा कल्याणजवळची ५ बेस्ट मॉन्सून पिकनिक स्पॉट्स

किडनी स्टोन की युरीन इन्फेक्शन? दोघांमधील फरक कसा ओळखायचा?

SCROLL FOR NEXT