Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ; बुरशी,अळ्या असलेला आहार पुरवठा

Bhandara News : शाळा व अंगणवाडीतील मुलांना शासनाच्या वतीने पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. हा पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जात आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : अंगणवाडी व शाळांमध्ये मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी आहेत. मात्र पुरवठादाराकडून अजूनही मुलांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे समोर येत आहे. याच दरम्यान भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहारातील अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बालकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

शाळा व अंगणवाडीतील मुलांना शासनाच्या वतीने (Poshan Aahar) पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. हा पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जात आहे. यासाठी बचत गटांच्या महिलांना हे काम दिले जात असते. अशाच प्रकारे (Bhandara) भंडारा शहरातील अंगणवाडीसाठी आहार शिजविण्यासाठी बचत गटांना काम देण्यात आले आहे. मात्र या बचत गटांकडून दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. 

अंगणवाडीतील लहान मुलांना येथे आहार देण्यात यावा; यासाठी शासनाच्या वतीने योजना सुरू करण्यात आली आहे. तुमसर शहरातील अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार शिजविण्याचे कंत्राट बचत गटांना देण्यात आले आहे. मात्र बचत गटाच्या माध्यमातून बालकांना निकृष्ट पोषण आहार दिला जात असल्याने अंगणवाडी सेविका यांनी याची तक्रार नगरपरिषदकडे केली आहे. मात्र याकडे नगर परिषदचे अधिकारी यांनी लक्ष दिले नाही. आता पुन्हा याची तक्रार करण्यात आली असुन अधिकारी काय कारवाई करतात ते पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT