Bhandara Rain News Saam TV
महाराष्ट्र

Bhandara : मुसळधार पावसामुळं पुराचा गावाला चारही बाजूने वेढा; ४ हजार लोक अडकले

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेय.

अभिजित घोरमारे

भंडारा: भंडारा-गोंदिया जिल्ह्यात (Bhandara-Gondia District) मागील दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वाढलेल्या पाणी पातळीमुळे भंडारा शहरालगत असलेल्या खमारी गावला पुराणी वेढा दिला आहे.

वैनगंगा नदी (Wainganga River) पात्रापासून खमारी गावं जवळपास २ किलोमीटर अंतरावर असून देखील पुराच्या पाण्याची फूग लांबपर्यंत आल्याने आता या गावाला चारी बाजूंनी पाण्याचा वेढा पडल्यामुळे या गावात जवळपास चार हजार लोक अडकले आहेत.

हे देखील पाहा -

गावाच्या चारी बाजूला पाणी साचल्यामुळे खमारी गावाला बेटाचं स्वरूप आलं आहे. त्यामुळे सलग ३ दिवसापासून गावात लोकं अडकली आहेत. शिवाय गावाला पाण्याचा वेढा पडल्याने गावात ये-जा करण्यासाठी कोणताचं पर्याय शिल्लक नाहीये.

त्यामुळे खमारी गावात एखाद्याची प्रकृति बिघडली तर त्याला रूग्णालयात नेण्यासाठी कुठलाही रस्ता उरला नाही. तर ३ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे या गावात अड़कुन पडलेल्या गांवकऱ्यापर्यंत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाहीये.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT