Bhandara News Tiger Attack saam tv
महाराष्ट्र

Bhandara: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; आठ दिवसात दुसरा बळी

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; आठ दिवसात दुसरा बळी

अभिजीत घोरमारे

भंडारा : आठवडाभरापूर्वी भंडारा जिल्ह्याच्या इंदोरा जंगलात मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा बळी घेणाऱ्या सीटी-1 वाघाने शुक्रवारी पुन्हा एका शेतकऱ्याचा (Farmer) बळी घेतला. शेतातील पिकाची पाहणी कराण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने (Tiger) हल्ला करुन ठार केले. (Bhandara News Tiger Attack)

भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शेतशिवारात आज सकाळी घटना घडली. या वाघाची ही 13 वी शिकार (Tiger Attack) असून लाखांदुर तालुक्यातील चौथी घटना आहे. तेजराम बकाराम कार (वय 45, रा. कन्हाळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ते गावातील मनोज शालिक प्रधान (3प) यांच्यासोबत शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पिकाची पाहणी करून शेळ्यांसाठी चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडावयास गेलेल्या तेजरामवर वाघाने अचानक हल्ला चढविला. हा थरार पाहून मनोजने प्रचंड आरडा ओरड केली.

वन विभागाकाडून पंचनामा

घटनेची माहिती मोबाईलवरून गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गावकऱ्यांनी वन विभागाला (Forest Department) माहिती देताच वन परिक्षेत्राधिकारी यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

वर्षभरात चार बळी

लाखांदूर तालुक्यात वर्षभारात सीटी-1 वाघाने चौघांचा बळी घेतला. यामध्ये 27 जानेवारीला दहेगाव जंगलात प्रमोद चौधरी, 4 एप्रिलला इंदोरा येथील जंगलात जयपाल कुंभरे व आठवडाभरापूर्वी 21 सप्टेंबरला विनय खंगन मंडल (45) यांना ठार केले. या वाघाने भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या 4 जिल्ह्यात 13 जणांचा बळी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT