Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थांना मुदत बाह्य पोषण आहार; चौकशीअंती होणार कारवाई

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या चांदपुर येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक वास्तव समोर आला आहे. शाळेत मुदतबाह्य पोषण आहार विद्यार्थ्यांच्या ताटात दिला जात होता.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: जिल्हा परिषदेतील मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. परंतु हा निकृष्ट पोषण आहाराबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही. यात भंडारा जिल्ह्याच्या चांदपुर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मुदतबाह्य पोषण आहार दिला जात असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे समोर आले आहे. 

भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या चांदपुर येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक वास्तव समोर आला आहे. शाळेत मुदतबाह्य पोषण आहार विद्यार्थ्यांच्या ताटात दिला जात होता. याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीला झाला असता या संदर्भात तुमसर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. गोर गरीब लोकांच्या मुलांसाठी (Poshan Aahar) पोषण आहार दिला जातो. पण हाच पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे आता काय कारवाई होतें याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानंतर याची संपूर्ण चौकशी करण्यात आली होती. 

मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस 

गट शिक्षणाधिकारी यांनी चौकशी करत तसा अहवाल (Zp School) जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठविला आहे. तर आता या संदर्भातील चांदपुर येथील शाळेच्या मुख्याध्यापिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असुन चौकशी अंती करावी केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT