Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Bhandara News ; वीज निर्मितीच्या प्लांट मधून निघणाऱ्या वेस्ट वॉटरच्या प्रवाहात गोसीखुर्द धरणाच्या परिसरात असलेल्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात मच्छीमारीचा व्यवसाय करतात

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : गोसीखुर्द धरणाच्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रवाहात मासेमारी करताना मच्छिमाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह वीज निर्मिती कंपनीच्या कार्यालयात ठेवला. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. 

भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणातील पाण्यावर महती हायड्रो कंपनी २०१७ पासून वीज निर्मिती करीत आहे. या वीज निर्मितीच्या प्लांट मधून निघणाऱ्या वेस्ट वॉटरच्या प्रवाहात गोसीखुर्द धरणाच्या परिसरात असलेल्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात मच्छीमारीचा व्यवसाय करतात. याच बेस्ट वॉटरमध्ये गोसीखुर्द येथील महेश भोयर (वय ३६) हा मासे पकडण्यासाठी गेला होता. मासे पकडत असताना त्याचा बुडून मृत्यू (Death) झाला. 

ग्रामस्थांना कार्यालयात गोंधळ 

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी महेश याचा मृतदेह बाहेर काढून तो महती हायड्रो कंपनीच्या कार्यालयात ठेवला. सकाळपासून हा मृतदेह वीज निर्मिती कंपनीच्या कार्यालयात ठेवल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी आरसीबी पथकासह अड्याळ आणि पवनी पोलीस ठाण्याचं अतिरिक्त पोलीस पथक पाचारण करण्यात आले होते. 

पोलिसांच्या मदतीने आर्थिक मदत 

दरम्यान ग्रामस्थांनी गोंधळ घालण्यास सुरवात केल्याने पोलिसांना बोलाविण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलिसांच्या मध्यस्थीनं महती हायड्रो वीज निर्मिती कंपनीने मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखाची आर्थिक मदत दिल्यानंतर तब्बल सहा तासानंतर प्रकरण निवडलं. आर्थिक मदत मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह कार्यालयातून नेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT