Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशानंतर मविआत बिघाडी; नाराज पदाधिकारी मेळाव्यात ठरविणार भूमिका

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर- मोहाडी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत यावरून बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यातील तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या प्रवेशानंतर शरद पवार पक्षासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील तुमसर- मोहाडी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत यावरून बिघाडी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटातील स्थानिक (Mahavikas Aaghadi) कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. यात स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल; असे पक्षश्रेष्ठींमार्फत सांगण्यात आले होते. मात्र तसे न होता परस्पर पक्ष प्रवेश करण्यात आला. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्यांनी बैठक घेऊन सर्वांची मतं जाणून घेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली. 

नाराज पदाधिकाऱ्यांचा होणार मेळावा 

पक्षात नव्याने आलेल्या व्यक्तीला तिकीट कसे द्यायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान २२ ऑक्टोबरला भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे या नाराज पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा होणार असून या माध्यमातून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT