Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

पुराच्या पाण्यात कार गेली वाहून..वेळीच मदत मिळाल्याने दोघांचे वाचले प्राण

पुराच्या पाण्यात कार गेली वाहून..वेळीच मदत मिळाल्याने दोघांचे वाचले प्राण

अभिजीत घोरमारे

भंडारा : अति घाई संकटात नेई या उक्तिची प्रचिती भंडारा जिल्ह्यात आली. अति शहानपण करत वाहत्या मार्गावरुन एका कार चालकाला चांगलेच महागात पडले आहे. अचानक पाण्याचा प्रवाह आल्‍याने कार पाण्यात (Bhandara) तरंगत वाहू लागली होती. परंतु, नागरीकांच्‍या प्रसंगावधानाने कारमधील नागरीकाचे प्राण वाचले आहेत. (Bhandara News Heavy Rain)

भंडाऱ्यात अतिवृष्टिने हाहाकार माजविला असुन जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टिचा (Heavy Rain) कहर पहायला मिळत आहे. चौफेर नजर फिरविली की रस्त्यावर शेतात, घरात पाणीच पाणी दिसू लागले आहे. यामुळे जिल्ह्यात 45 गावमार्ग बंद असून मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यातील 170 घरे क्षतिग्रस्त झाले आहे.

नशीब बलबत्‍तर म्‍हणून..

मोहाडी शहरात चंडेश्वरी मंदिराजवळील मार्गावर लागलेला नाल्यातुन पुराचे पाणी वाहत असल्याने नाल्यालगतचा रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान हा रस्त्या पार करत असताना अचानक पाण्याच्या प्रवाह वाढल्याने कार पाण्यात तरंगु लागली. वेळीच दोन लोक कारसह वाहून जाणार तोच लोक मदतीला धाउन येत वाहती कारला पकडून ठेवल्याने कारसह दोन लोकांना प्राण वाचले आहे. नसीब बलवत्तर होते म्हणून कार मधील दोन्ही लोक बचावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Maharashtra News Live Update:घोडबंदर रोडवरील काँक्रिटीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 25 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

SCROLL FOR NEXT