Bhandara News Saam Digital
महाराष्ट्र

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात पोलिसांची दादागिरी, धकाबुक्कीत वृद्ध जखमी

Bhandara News Update: भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात पोलिसांच्या दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. वादावादी सुरू असताना ठाणेदाराने वृद्धाला धकाबुक्की केली, यात वृ्द्ध खाली पडून त्यांना जबर मार लागला आहे .

Sandeep Gawade

Bhandara News

भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात पोलिसांच्या दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. वादावादी सुरू असताना ठाणेदाराने वृद्धाला धकाबुक्की केली, यात वृ्द्ध खाली पडून त्यांना जबर मार लागला आहे . आता हा व्हिडिओ समाज मद्यामांवर चांगलाच वायरल झालं होत असून पोलिसांच्या कृत्याबाबत संताप व्यक्त होत आहे.

मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उसर्रा येथील सुधाकर बोपचे यांची गावात जागा आहे. पण या जागेवर तुमसर येथील अग्रवाल यांनी दावा केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून आपल्या जागेवर बांधकाम करत असल्याची माहिती अग्रवाल यांनी आंधळगाव पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचत सुधाकर बोपचे यांना विचारपूस करत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी पोलीस व बोपचे यांच्यात चांगलाच शाब्दीक वाद झाला. हा वाद सुरू असतानाच आंदळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजकुमार यांनी बोपचे यांना जोराचा धक्का दिला. त्यात बोपचे हे खाली पडले आणि त्यांच्या नाकाला मार लागला. त्यात ते जखमीही झाले. त्यानंतर पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप बोपचे यांनी केला आहे. तर आपण मारहाण केली नसल्याचे ठाणेदार यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT