Wainganga River Flood Saam tv
महाराष्ट्र

Wainganga River Flood : वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; कारधा छोट्या पुलावर पाणी आल्याने पुल केला बंद

Bhandara News : राज्यातील बहुतांश भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. कुठे मुसळधार पाऊस होत आहे. तर कुठे पावसाची रिपरिप सुरु आहे

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यात मागिल चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पावसाची संततधार सुरू असल्याने वैनगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे भंडारा जवळील कारधा छोट्या पुलावर पाणी असल्याने हा पुल बंद करण्यात आला आहे. 

राज्यातील बहुतांश भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. कुठे मुसळधार पाऊस होत आहे. तर कुठे पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान (Bhandara) भंडारा जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती असून मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातून गेलेल्या वैनगंगा नदीला पूर आला आहे. तर महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या सुमावर्ती भागात देखील पावसाचा जोर कायम (Heavy Rain) असल्याने वैनगंगा नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

नदी काठच्या गावांना इशारा 

पावसाचा जोर कायम असल्याने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने आता गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कारधा छोट्या पुलावर देखील पाणी आल्याने हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT