Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: दूध आणायला गेला तो परतलाच नाही; शेतात आढळला मृतदेह

दूध आणायला गेला तो परतलाच नाही; शेतात आढळला मृतदेह

अभिजीत घोरमारे

भंडारा : शेतातून दूध घेऊन घराकडे येत असलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्‍ह्याच्‍या मोहाडी तालुक्यातील रामपुर येथे उघडकीस आली आहे. गावालगतच्या शेतात मृतदेह (Crime News) आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

रामपूर (जि. भंडारा) प्रदीप लक्ष्मण धांडे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोहाडी तालुक्यातील रामपूर- मांडेसर येथील प्रदीप धांडे हा शेतीसोबत पशु पालनाच्या व्यवसाय करीत होता. २२ मार्चला सायंकाळी शेतात बांधलेल्या जनावरांच्या दूध काढण्यासाठी गेला होता. दूध काढल्यानंतर दुधाची बकेट घेऊन घराकडे येण्यास निघाला. त्यावेळेस गावालगत असलेल्या शेतात अज्ञात आरोपींनी डोक्यावर वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घरी न आल्‍याने शंका

प्रदीप घरी परतला नसल्याने शेतात जाऊन बघितले असता प्रदीप यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेच्या पंचनामा केला आहे. प्रदीपच्या डोक्यावर जखम असल्याने प्रदीपची हत्या केल्याची शंका पोलिसांनी वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT