Bhandara Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime : तक्रार केल्याच्या रागातून तरूणावर प्राणघातक हल्ला; तुमसर येथील रात्रीची घटना

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरवार्डातील रेवा रहांगडाले याने हल्ला करणाऱ्यांवर पोलिसात तक्रार दिली होती

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यातील तुमसर तुमसरातील शहर वार्डात रात्री घराशेजारी बसलेल्या रेवा रहांगडाले नामक तरुणावर तिघांनी तक्रार दिल्याच्या वादातून वाद घातला. या वादात तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर शहरवार्डातील रेवा रहांगडाले याने हल्ला करणाऱ्यांवर पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन तिघेजण कारागृहात गेले होते. आपली तक्रार केल्याने कारागृहातून बाहेर आल्यानंतर रेवा रहांगडाले याचा वचपा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार हा घटनेच्या दिवशी रहांगडाले हा घरासमोर बसला होता. (Crime news) यावेळी शहर वार्ड परिसरातील संशयित आरोपी कार्तिक उर्फ काल्या राऊत (वय २१), सौरभ उर्फ चोख्या राऊत (वय २०) व उमेश मस्के (वय २३) यांनी रेवा रहांगडाले याचेशी वाद घातला. 

या वादातच कार्तिक याने सोबत नेलेल्या धारदार चाकूने रेवा रहांगडाले याच्यावर वार करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात गंभीर जखमी रेवा याला उपचाराकरीता भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. सदर घटनेतील आरोपी अद्याप फरार असून या घटनेने तुमसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींच्या मागावर असून तुमसर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT