Bhandara : भाजप पदाधिकारी प्राध्यापकाचा कॉलेजच्या कर्मचाऱ्यावर गोळीबार! अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara : भाजप पदाधिकारी प्राध्यापकाचा कॉलेजच्या कर्मचाऱ्यावर गोळीबार!

अमित हुकुमचंद गायधनी असे हल्लेखोर संस्थाचालक व प्राध्यापकाचे नाव असून गायधनी हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : लाखनी शहरातील विदर्भ महाविद्यालयाचा संस्थाचालक व त्याच महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापकाने, महाविद्यालयातीलच कर्मचारी असणाऱ्या सुभाष गोपाल आगाशे नामक व्यक्तीवर गोळीबार केला आहे. अमित हुकुमचंद गायधनी असे हल्लेखोर संस्थाचालक व प्राध्यापकाचे नाव असून गायधनी हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. दरम्यान हा गोळीबार का करण्यात आला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हे देखील पहा :

संस्थाचालक असलेला अमित हुकुमचंद गायधनी हा नवशक्ती पीठ शिक्षण संस्था मुरमाड-सावरी मध्ये सहसचिव असून या संस्थेअंतर्गत असलेल्या विदर्भ महाविद्यालय लाखनी येथे भूगोल विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे, तसेच भारतीय जनता पक्षामध्ये उच्चपदस्थ पदाधिकारी म्हणून देखील कार्यरत आहे. सदर आरोपी आपल्या राजकीय पक्षाचा व मोठ्या ओळखीचा फायदा घेत महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना नेहमी हमरीतुमरी ची भाषा करून अपमानित करत असल्याची तक्रार महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांनी दिली आहे.

संपूर्ण महाविद्यालय प्रशासन या संस्थाचालकाच्या मुजोरी पणाला वैतागले असल्याची चर्चा गावात आहे. आजही त्याने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर बंदुकीने गोळी झाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या गोळीबारात सुभाष गोपाल आगाशे यांना छातीजवळ गोळी लागून गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या गायधनी याला लाखनी पोलिसांनी भंडाऱ्यात अटक केली आहे. त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT