Bhandara News अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

दुर्देवी! शाळेच्या मधल्या सुट्टीत मित्रांसोबत खेळायला गेला, तो पुन्हा परतलाच नाही

देवेंद्र हा हसारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकत होता.

अभिजीत घोरमारे

भंडारा: मित्रांसोबत खेळायला गेलेल्या ५ वीच्या वर्गाच शिकत असणाऱ्या एका मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना, भंडाऱ्यामधील (Bhandara) तुमसर तालुक्यातील हसारा या गावामध्ये घडली आहे. देवेंद्र अजय बोंद्रे वय 12 वर्ष असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. देवेंद्र हा हसारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र नेहमीप्रमाणे दहा वाजता शाळेत (School) गेला होता, मधली सुट्टीत नेहमीप्रमाणे जेवन वगैरे करुन आपल्या दोन तीन मित्रांसोबत शाळेलगत असलेल्या गावातील तलावाकडे मित्रांसह खेळायला गेला होता.

खेळत असताना अचानक तलावातील पाळीवरून पाय घसरून देवेंद्र तलावात पडला आणि तो बुडू लागला. आपला मित्र तलावात बुडत असल्याचं पाहून सोबत असलेल्या विद्यार्थांनी लगेच आरडा ओरड करत गावातील लोकांना देवेंद्र तलावात पडल्याचं सांगितलं.

गावाकऱ्यांनी तात्काळ त्या तलावाकडे धाव घेत देवेंद्रला बाहेर काढलं आणि तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृतक देवेंद्र त्याचा मामा रामु हिंगे यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता. तो मुळचा निलज येथील रहिवासी असुन आपल्या मामाकडे शिक्षणासाठी राहिला होता. देवेंद्रच्या त्यांच्या अशा अकाली निधनामुळे हसारा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात होणार बंडखोर खासदारांचा फैसला; २०खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT