Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: ट्रॅक्‍टरवरील ताबा सुटला; नियंत्रण मिळविताना खाली पडल्‍याने मृत्‍यू

ट्रॅक्‍टरवरील ताबा सुटला; नियंत्रण मिळविताना खाली पडल्‍याने मृत्‍यू

अभिजीत घोरमारे

भंडारा : मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाचा भरधाव असलेल्या ट्रॅक्टरवरून ताबा सुटला. यामुळे झालेल्या अपघातात (Accident) ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (Bhandara) भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे घडली आहे. खेडचंद शेडमाके असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे. (Letest Marathi News)

पिंपळगाव कोहली निवासी आशिष परशुरामकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये घरगुती कामाकरीता विटा भरून लाखांदूरवरून पिंपळगाव कोहलीकडे जात होता. लाखांदूर येथील शवविच्छेदन गृहाच्या मागील पटांगणावरील रस्त्यावर भरधाव असलेला ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. ट्रॅक्टर चालक खेडचंद शेडमाके हा ट्रॅक्टर नियंत्रित करण्याच्या बेतात असताना अचानक उसळून ट्रॅक्टर खाली पडला व यातच त्याचा मृत्यू (Death) झाला.

रुग्णालयात पोहचण्यापुर्वीच मृत्‍यू

अपघाताची माहिती मिळताच काही लोकांनी खेडचांद शेडमाके यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्रकरणाची नोंद केली आहे. पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत. आज होळीच्या पहिल्याच दिवशी अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 वर्षांत पगार दुप्पट? वाचा 8व्या वेतन आयोगाचे कॅलक्युलेशन

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीस यांच्या काकांना विश्वास

Maharashtra News Live Update: कणकवलीत अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक तपासणी

Maharashtra Freedom of Religion Act 2026: राज्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; उल्लंघन केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT