Bhandara Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; धान्य खरेदीसाठी जाताना व्यापाऱ्याचा मृत्यू

Bhandara News : अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार काही अंतरापर्यंत फेकला गेला. यानंतर ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर मार्गावर गर्दी जमली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यातील तुमसर- गोबरवाही मार्गावरील टुमनी नाल्याजवळ भीषण अपघात झाला आहे. यात मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात परसवाडा (दे.) येथील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघात घडल्यानंतर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी प्रविन खवास (वय ३५) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रविण खवास हे दुचाकीने तुमसरहून गोबरवाहीकडे धान्य खरेदी करीता जात होते. याच दरम्यान टुमनी नाल्याजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने प्रविन खवास यांचा जागीच मृत्यू झाला. 

वाहतूक झाली ठप्प 

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार काही अंतरापर्यंत फेकला गेला. यानंतर ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर मार्गावर गर्दी जमली होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक देखील काही काळासाठी ठप्प झाली होती. तर प्रविणच्या मृत्यू नंतर बाजार समितीतील सहकार्‍यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रक चालक झाला फरार 

अपघात घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह रुग्णालयात नेट खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान फरार ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

SCROLL FOR NEXT