Bhandara Accident News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident News : ओव्हरटेक करताना ट्रकची धडक; कारमधील आठ प्रवासी जखमी

Bhandara News : ओव्हरटेक करताना ट्रकची धडक; टाटा मॅजीकमधील आठ प्रवासी जखमी

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: राष्ट्रीय महामार्गावरून भंडाराकडे जात असलेला मालवाहू ट्रक जात होता. याचवेळी समोरून प्रवाशांना घेऊन (Bhandara) भंडाऱ्याच्या दिशेने येत असलेल्या कारला जोरदार धडक (Accident) दिली. यात कारमधील चालकासह आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. (Tajya Batmya)

सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी शिवारात घडली असून या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचार्थ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान भंडारा येथून लाखनीकडे प्रवाशी वाहनात आठ प्रवाशी बसून जात होते. दरम्यान पलाड़ी शिवारात कारमधील चालक समोर जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता.  

ओव्हरटेक करत असताना अंदाज चुकला व विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक दिली. यात कारमध्ये बसलेले आठ प्रवासी जखमी झाले. नंदकुमार डोमाजी रामटेके (रा. खेडेपार) यांच्या तक्रारीवरून कार चालक नंदलाल देंगे (रा. कन्हाळमोह) यांच्याविरुद्ध कारधा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास हवालदार खडसे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा; टीएमसी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, वाहनांवर दगडफेक

Kalyan Crime : 'मी माझ्या बायकोला मारून आलो'; हैवान नवऱ्यानं ९ वर्षांच्या मुलासमोरच बायकोचा जीव घेतला

Maharashtra Live News Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

घरच्या घरी कसा बनवाल खुसखुशीत मालपुआ, पाहा अगदी सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT