Bhandara Accident News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident News : उपचार घेऊन घरी परतणाऱ्या वृद्धाचा मृत्‍यू; डंपरने दिली धडक

उपचार घेऊन घरी परतणाऱ्या वृद्धाचा मृत्‍यू; डंपरने दिली धडक

साम टिव्ही ब्युरो

भंडारा : ग्रामीण रुग्णालय पवनी येथून उपचार घेऊन घरी परततांना गिट्टी भरून जाणाऱ्या टिप्परने एका वृद्धाला (Accident) जबर धडक दिली. यात वृद्धाच्‍या अंगावरून डंपर गेल्‍याने यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. (Breaking Marathi News)

पवनी येथील ग्रामीण रूग्‍णालयात उपचारासाठी गेलेले लहू लहानुजी वैद्य (वय ८२, रा. बस्तारवारी वॉर्ड) असे मृत वृद्धाचे नाव आहे. उपचार घेवून लहू वैद्य हे घरी जात होते. या दरम्‍यान निलजकडून वैनगंगा नदीकडे जाणाऱ्या महामार्गावर लहू लहानुजी वैद्य रस्ता ओलांडत होते. यावेळी टिप्परने जोरदार धडक दिल्याने लहू वैद्यचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान लाखांदूरचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे पवनीला येत असतांना मृतक रस्त्यावर पडला असल्याचे दिसले. लगेच त्यांनी पवनी पोलिसांना पाचारण करून कारवाई सुरू केली. पळून गेलेल्या टिप्परचा पाठलाग करून पोलीसांना टिप्परला पकडण्यात यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT