Bhandara Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident : खेळत असलेल्या बालकाला आरटीओ वाहनाची धडक; बालकाचा जागीच मृत्यू

Bhandara News : भंडारा एलसीबीच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली होती. या ट्रकला जवाहरनगर पोलीस ठाण्यातून खरबी येथील वंजारी यांच्या राईस मिलवर वजन करण्याकरिता नेण्यात येत होतं.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : रस्त्याच्या बाजूला खेळत असलेल्या अडीच वर्षीय बालकाला आरटीओ कार्यालयाच्या वाहनाने धडक दिली. यात या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या खरबी इथं रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी आरटीओच्या वाहनावरील कंत्राटी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

पूर्वांश रामकृष्ण वंजारी असं मृतक अडीच वर्षीय बालकाचे नाव आहे. तर, दिशांत मुस्तकी मिर्झा (वय ३५) असं आरटीओच्या गाडीवरील वाहन चालकाचं नाव असून तो (Bhandara) भंडारा येथील रहिवासी आहे. भंडारा एलसीबीच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली होती. या ट्रकला जवाहरनगर पोलीस ठाण्यातून खरबी येथील वंजारी यांच्या राईस मिलवर वजन करण्याकरिता नेण्यात येत होतं. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. 

वजन करण्यासाठी नेण्यात येत असलेल्या ट्रकच्या पुढे असलेल्या आरटीओच्या वाहनाची धडक राईस मिल समोर खेळत (Accident) असलेल्या बालकाला बसली आणि त्यातचं त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरटीओचं वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चालकाला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

Maharashtra Live News Update: दक्षिण महाराष्ट्रात पुढील २ दिवसात पावसाची शक्यता

Crime: किरकोळ वादातून भयंकर हत्याकांड, तलवारीने सपासप वार करत तरुणाने बायको अन् मुलाला संपवलं

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

रक्ताने माखले, स्ट्रेचरवरून खाली पडले; भाजपच्या महामंत्र्याचा जागेवर मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

SCROLL FOR NEXT