बाब्बो! भंडाऱ्यात JCBने रंग उधळून अनोखी होळी (पहा Video)  SaamTvNews
महाराष्ट्र

बाब्बो! भंडाऱ्यात JCBने रंग उधळून अनोखी होळी (पहा Video)

या अनोख्या होळीचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : होळी आणि धूलिवंदन देशभरात मोठ्या उत्साहात पार पडत असून रंगांचा सण समजल्या जाणाऱ्या होळीचा (Holi Festival) आनंद अबाल वृद्धांसोबत सर्वच जण लुटत आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे सर्वच सण (Festival) साजरे करता आले नाहीत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लावण्यात आलेले कडक निर्बंध आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे नागरिकांना एकत्र येण्यास बंधने होती. (Unique Holi By Spraying Colors through JCB)

मात्र, आता कोरोना (Corona) विषाणू नियंत्रणात आल्याने निर्बंधातून सूट मिळाली आहे. नागरिक सर्व सण उत्साहात साजरे करत आहेत. होळीचा सण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र, 'हौसेला मोल नाही' असे म्हणतात; याचीच प्रचिती भंडारा (Bhandara) जिल्ह्यात आली असून आज सर्वत्र रंगांचा उत्सव साजरा होत असताना होळीनिमित्त गावात काहीतरी हटके करावे म्हणून भंडारा जिल्हाच्या पवनी (Pavani) तालुक्याअंतर्गत येणाऱ्या येनोळा गावातील लोकांनी होळी सणाचे औचित्य साधत चक्क 3 जेसीबीच्या (JCB) साहाय्याने गावकऱ्यांवर रंगाची उधळण केली. या अनोख्या होळी उत्सवाची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. या अनोख्या होळीचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT