Paduka Darshan Sohla Saam tv
महाराष्ट्र

Paduka Darshan Sohla : श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाची उत्कंठा शिगेला; मुंबईत 'भक्तीचा महाकुंभ' भरणार

Paduka Darshan Sohla update : श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मुंबईत 'भक्तीचा महाकुंभ' भरणार आहे. मुंबईतील वरळीत हा सोहळा भरणार आहे.

Vishal Gangurde

मुंबई : ' सकाळ माध्यम समूहा'कडून वरळीतील एनएससीआय डोम येथे श्री गुरु पादुका दर्शन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. ८ आणि ९ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. एकाच छताखाली २१ श्री गुरुंच्या मूळ पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या उत्सवादरम्यान रविवारी सकाळी ९ वाजता आध्यात्मिक मार्गदर्शक श्री एम यांचं व्याखान देखील होणार आहे.

कोण आहेत श्री एम?

पद्मभूषण श्री एम हे योगी आहेत. तसेच सत्संग फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरु आहेत. समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, जागतिक कीर्तीचे वक्ते श्री एम यांनी 'आध्यात्मिक एकांतवास' आणि 'वेद' या विषयांवर जगभरात व्याख्याने दिले आहेत. श्री एम हे उपस्थितांशी संवाद साधतात. तसेच त्यांच्या विविध शंकांचं निराकरण करतात. त्यांचे विचार ऐकण्याची संधी या उत्सवानिमित्त उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्रातील संत-महत्म्यांच्या विचाराने समृद्ध आहे. महाराराष्ट्रातील भाविक श्रद्धास्थानांच्या भक्ती सुगंधासाठी सदैव व्याकूळ असतात. मात्र, प्रत्येकाला श्रद्धेच्या ठिकाणी श्री गुरुंच्या चरणी नतमस्तक होणे शक्य नसते. त्यामुळे 'सकाळ'ने 'भक्तीचा महाकुंभ' आयोजित केला आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता महोत्सवात 'भक्ती शक्ती व्यासपीठ'चं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळणार आहे. 'सकाळ'तर्फे आयोजित उत्सवात आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक,शैक्षणिक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुरुसेवा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याची निश्चित केलं आहे. तसेच सर्वसामान्य भाविकही सोहळ्यासाठी आतूर झाले आहेत.

ऑनलाइन नोंदणी सुरु

उत्सवात पोहोचण्यासाठी महालक्ष्मी (पश्चिम रेल्वे), भायखळा (मध्य रेल्वे) ही रेल्वे स्थानके जवळ आहेत. या उत्सवात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. प्रत्येकाला श्रीपादुकांचे दर्शन व्हावे,यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरु केली आहे. त्यासाठी क्यूआर कोड करून प्रवेश निश्चित करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT