केंद्राच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही यात्रा - भागवत कराड  विनोद जिरे
महाराष्ट्र

केंद्राच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही यात्रा - भागवत कराड

कराड लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक...

विनोद जिरे

बीड - भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड Bhagwat Karad यांची जन आशीर्वाद यात्रा आज परळी येथील गोपीनाथ गडावरुन निघाली आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन, भागवत कराड यांनी या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी, या जन आशीर्वाद यात्रेला भाजपचा झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे. यावेळी खासदार प्रीतम मुंडे Pritam Munde देखील उपस्थित होत्या.

हे देखील पहा -

दरम्यान ही जन आशीर्वाद यात्रा गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन, केंद्राच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काढण्यात आली आहे अशी माहिती यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली.

दरम्यान यावेळी मुंडे समर्थकांनी कराड हे गोपीनाथ गडावर दाखल होताच तीव्र घोषणाबाजीला सुरुवात केली. पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है, अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे. यासह अनेक तुफान घोषणा याठिकाणी देण्यात आल्या.

तर यावेळी घोषणाबाजी वरून, पंकजा मुंडे प्रचंड संतप्त झाल्या होत्या, त्यांनी कार्यकर्त्यांना देखील झापलं. चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, चांगल्या घोषणा द्या, भंगार अंगार या काय घोषणा देतायत, हे संस्कार आहेत का आपले, अस म्हणत संतापलेल्या पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT