eknath shinde news Saam tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

eknath shinde news : एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार आहे. पंढरपुरातील दोन बड्या नेत्यांची शिंदे गटात एन्ट्री होणार आहे.

भरत नागणे

पंढरपुरात एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

पंढरपुरात भालके कुटुंब शिवसेनेत प्रवेश करणार

दोन बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी कालपासून तयारीला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती केली. शिवसेनेने संघटनवाढीसाठी विशेष लक्ष दिलं आहे. आता एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार आहे. कारण पंढरपूरमधील दोन बडे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके आणि नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भव्य प्रदर्शन करत भगीरथ भालके शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे. पंढरपूर नगरपालिकेत भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ११ नगरसेवक आहेत. भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ताकद वाढणार आहे.

कसं आहे पंढरपूरमधील राजकीय समीकरण?

नगरपालिकेच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके यांनी उमेदवारी दिली होती. तर भाजपने श्यामल शिरसाट यांना उमेदवारी दिली होती. दोन्ही पॅनलकडून प्रचारात आघाडी घेतली होती. या निवडणुकीत प्रणिता भालके यांनी बाजी मारली होती. भालके यांच्या विजयाने पंढरपूर नगरपालिकेत सत्तांतर झालं होतं. दिवंगत भारत भालके यांनी २०११ साली तीर्थक्षेत्र विकास आघाडीने सत्ता मिळवली होती. त्यानंतर सूनबाई प्रणिता भालके यांच्या नेतृत्वात तीर्थक्षेत्र विकास आघाडीने बाजी मारली आहे.

भालके कुटुंबाचा काँग्रेस ते शिवसेना प्रवास

भालके कुटुंब आधी काँग्रेसमध्ये होते. दिवंगत भारत भालके काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर भगीरथ भालकेंनी एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु भगीरथ भालकेंना पराभवाला सामोरो जावं लागलं. पुढे भालके पंढपूर नगर परिषदाच्या निवडणुकीला सामोरे गेले.

भगीरथ भालके यांची पत्नी प्रणिती यांनी स्थानिक आघाडी करून नगर परिषद निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यानंतर या निवडणुकीत प्रणिती भालके विजयी झाल्या. त्यानंतर पंढरपूरमध्ये आपलाच नगराध्यक्ष झाल्याचे विधान एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्याचवेळी भालके कुटुंबाने पक्षप्रवेशाचे संकेत मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

Cloudburst : गावे पाण्याखाली, हायवेवरील पूल वाहून गेला; अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसाचा रुद्रावतार, VIDEO

Thane News : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Maharashtra News Live Update: सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

Thursday Horoscope : हवे तसे यश मिळेल, ५ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT