Bengaluru Crime News Saam TV
महाराष्ट्र

Bengaluru Crime News: ऑनलाईन बायको शोधण्याच्या नादात सगळंच गेलं? कोट्यवधींचा गंडा अन् तोंड लपण्याचीही वेळ आली

Fake Bride: तरुणीने त्याला विवस्त्र होत व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्याकडून पैसे उकळले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bengaluru News: ब्रिटनमधील एका सॉफ्टवेअर अभियंत्यासोबत फसवणूकीची एक मोठी घटना समोर आली आहे. एका महिलेने लग्नाचे वचन देत तरुणाकडून १.१ कोटी रुपयांहून अधिक पैसे उकळलेत. एका विवाह नोंदणी साईटवर या तरुणाने आपले नाव नोंदवले होते. येथून तरुणीने त्याला विवस्त्र होत व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्याकडून पैसे उकळले आहेत. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, व्हाईटफिल्ड सीईएन गुन्हे पोलिसांना महिलेच्या खात्यामधील ८४ लाख रुपये परत मिळवले आहेत. फसवणूक झालेला व्यक्ती ४१ वर्षीय असून तो केअर पुरमचा रहिवासी आहे. कामामधील प्रशिक्षणासाठी तो बेंगळुरूला आला होता.

या व्यक्तीला लग्न करायचे होते त्यामुळे त्याने लग्नाच्या वेबसाइटवर नोंदणी केली होती. बनावट प्रोफाइल असलेल्या एका महिलेने साइटवर त्याच्याशी मैत्री केली. काही दिवस मेसेजवर दोघांचं बोलणं झालं. त्यानंतर दोघांनी त्यांचे मोबाईल नंबर एकमेकांना शेअर केले.

महिलेने या व्यक्तीशी लग्न करण्यास सहमती दाखवली. तसेच माझ्या वडलांचे निधन झाले असून मी आईसोबत राहते असं या तरुणीने सांगितलं होतं. २ जुलै रोजी, तरुणीने त्याला कॉल केला होता. माझी आई आजारी असून तिच्या औषधासाठी पैसे हवे आहेत असं तिने त्या व्यक्तीला सांगितलं.

आईच्या उपचारासाठी फसवणूक झालेल्या व्यक्तीने तरुणीला तात्काळ १,५०० रुपये दिले. ४ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास तिने त्याला व्हिडिओ कॉल केला. यावेळी कॉलवर बोलताना तिने स्वत:चे कपडे काढले आणि नकळ तो कॉल रेकॉर्ड केला.

नंतर तिने ही क्लिप त्याला पाठवली. इतकेच नाही तर तरुणीने तरुणाच्या पालकांसोबत देखील ही व्हिडिओ शेअर करण्याची धमकी दिली. या बदल्यात आपल्या बँक खात्यांमध्ये १,१४,००,००० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT