Jalna : 25 ते 35 वयाच्या लोकांना चक्क निवृत्ती वेतन योजनांचा लाभ! महसूल विभागाचा सावळा गोंधळ! Saam Tv
महाराष्ट्र

Jalna : 25 ते 35 वयाच्या लोकांना चक्क निवृत्ती वेतन योजनांचा लाभ; महसूल विभागाचा सावळा गोंधळ!

जालन्यात राज्य सरकारच्या वतीने राज्यातील ६५ वर्ष वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मोठा सावळा गोधळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात राज्य सरकारच्या वतीने राज्यातील ६५ वर्ष वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मोठा सावळा गोधळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूल विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या या योजनेत चक्क २५ आणि ३५ वर्षाच्या जवळपास शेकडो नागरिकांना ६५ वर्षाचे लाभार्थी दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने, महसूल विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

हे देखील पहा :

जालन्यात महसूल विभागाच्या वतीने श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत नुकत्याच पात्र लाभार्त्यांच्या याद्या महसूल विभागाच्या कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. यात योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांना या याद्या नुसार राज्य शासनाकडून दरमहा ४०० आणि त्याच लाभार्थ्यास इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत (ब) अंतर्गत केंद्र सरकारकडून दरमहा २०० रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे.

मात्र, या योजनेसाठी त्या व्यक्ती चे वय हे ६५ वर्ष असावे असा नियम असतांना भोकरदन महसूल विभागाकडून लावण्यात आलेल्या यादीत शेकडो ज्यांची वय चक्क, २५ आणि ३५ वर्षाच्या जवळपास अशा व्यक्तीच्या समावेश केला गेला असल्याने महसूल विभागाचा सावळा गोधळ चव्हाट्यावर आलाय. महसूल विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या यादीत शेकडो नागरिकांची वयोमर्यादा बसत नसतांना त्यांची निवड या योजनेत करण्यात आल्याने महसूल विभागाच्या या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT