नागपूरचा भिकारी बोलतो फाडफाड इंग्रजी; भिकाऱ्याची जोरदार चर्चा (पहा व्हिडिओ) संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूरचा भिकारी बोलतो फाडफाड इंग्रजी; भिकाऱ्याची जोरदार चर्चा (पहा व्हिडिओ)

डोक्यावर बॉटल आणि उलटी चाल

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - नागपूरमध्ये Nagpur सध्या फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या भिकाऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. डोक्यावर बॉटल ठेऊन हा भिकारी उलटा चालतो, भर रस्त्यात एका पायावर उभा राहून योगा करतो इतकेच नाहीतर फाडफाड इंग्रजी देखील बोलतो. नागपूरमध्ये या अनोख्या भिकाऱ्याची beggar सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ये जा करणारे लोक क्षणभर थांबतात आणि या फाडफाड इंग्रजी English बोलणाऱ्या भिकाऱ्याकडे बघतात. हा व्हायरल Viral भिकारी सध्या नागपूरकरांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहे.

अंगावर लाल रंगाचे फाटलेले टी शर्ट, निळ्या रंगाची पॅट, डोक्यावर बॉटल आणि त्यावर ग्लास, उलटी चाल हाच आहे सध्या चर्चेचा विषय ठरलेला व्हायरल भिकारी. राहूल प्रभुदा पेटकर असे नाव सांगणारा हा भिकारी, नागपूरातील रस्त्यांवर उलटा चालतो. वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर सरळ चालताना अपघाताची अथवा कुणी येऊन आपल्यला धडकण्याची भिती असते, तिथे मात्र हा भिकारी निडर होऊन उलटा चालतो. जेवढ्या वेगाने हा भिकारी उलटा चालतो, तेवढीच फाडफाड तो इंग्रजी देखील बोलतो.

उलटा चालत असल्याने हा भिकारी नागपुरात सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यासोबतच हा भिकारी भररस्त्यात योगा देखील करतो. तसेच हा भिकारी सांगतो उलटं चालणे ही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बेस्ट प्रॅक्टीस आहे. “रहने को घर नाही, सोने को बिस्तर नही, अपना खुदा है उपरवाला अबतक उसीने पाला” असं म्हणत ५ रुपये मागून हा भिकारी आपल्या जेवणाची सोय करतो. उलटा चालण्याचा प्रवास जिथे संपला तिथेच हा भिकारी मुक्काम करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणहून उलटं चालण्याचा प्रवास पुन्हा एकदा सुरु होतो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT