Beed woman medical negligence after C-section surgery Saam TV
महाराष्ट्र

पहिलीच डिलिव्हरी होती अन् बाळाला कडेवर घ्यायच्या वयात...; बीडमधील 'त्या' घटनेने महाराष्ट्र सुन्न

Beed woman medical negligence after C-section surgery : बीड जिल्हा रुग्णालयात सिझरनंतर महिलेच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप आहे. गंभीर संसर्गानंतर महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून कुटुंबीयांनी दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Beed medical negligence : बीड जिल्हा रुग्णालयात सिझरच्या (प्रसुती) शस्त्रक्रियेनंतर एका महिलेच्या पोटात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोटात तीव्र त्रास सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी संध्या गायकवाड या पीडित महिलेला बीडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे उपचारासाठी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांना खाजगी रुग्णालयांत पाठवून मोठे 'सिंडिकेट' चालवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सध्या पीडित महिलेवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असून ती आयसीयूमध्ये (ICU) मृत्युशी झुंज देत आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील हातमोजे आणि कागदी रुमाल बाहेर काढले; मात्र या गंभीर संसर्गामुळे तिचे गर्भाशय देखील काढावे लागल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

"माझी मुलगी पहिल्यांदाच आई झाली आहे, पण आज ती स्वतःच्या बाळाला जवळ घेऊ शकत नाही. तिच्यावर ही वेळ आणणाऱ्या दोषी डॉक्टरांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करा," अशी मागणी करत पीडित महिलेच्या आईने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आता या निष्काळजी डॉक्टरांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

बिश्नोई गँगचा धुमाकूळ, मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड?70 हजार शार्पशूटरच्या निशाण्यावर बॉलीवूड, गुजरातच्या जेलमधून बिश्नोईची मुंबईत दहशत

घोडा अडकला, टायगर वाचला; आरोपींचं फूलप्रुफ प्लॅनिंग, पोलिसही चक्रावले

SCROLL FOR NEXT