Sushma Andhare On Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare On Beed Incident: महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? महिला निर्वस्त्र प्रकरणावरून अंधारेंचा फडणवीसांना सवाल

Sushma Andhare On Devendra Fadnavis: महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? महिला निर्वस्त्र प्रकरणावरून अंधारेंचा फडणवीसांना सवाल

विनोद जिरे

Sushma Andhare On Devendra Fadnavis:

''अहो गृहमंत्री साहेब, महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? कारवाईचे नाटक केले अटकेचे काय?'', असं म्हणत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीडमधील महिला निर्वस्त्र प्रकरणावरून देवेंद्र फडनविसांना सवाल केला आहे.

त्या म्हणाल्या आहेत की, ''पारधी समाज हा बहिष्कृत, उपेक्षित आणि सामाजिक दृष्ट्या आर्थिक दुर्बल आहे. हा समाज कष्टाची भाकरी करून खाण्यासाठी मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या नव्या पिढीला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असं असताना प्रस्थापित गावगुंडांची दहशत मात्र कमी होत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंधारे म्हणाले, ''स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणारे जेव्हा गुंडगिरी करतात, या वंचित, उपेक्षित, बहिष्कृत समाजातील माय माउल्यांच्या पदरांना हात घालण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. (Latest Marathi News)

त्या म्हणाल्या., आमची विनंती असेल पुन्हा एकदा गृहमंत्री साहेब, कायदा सुव्यवस्थेचा किती वेळा बोजवारा उडतोय, कारवाईचे नाटक केले अटकेचे काय ? आरोपी हे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार असो की जहागीरदार असो, यांना अटक करणार की नाही? हा खरा प्रश्न आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बीडमध्ये एका जमिनीचा वादातून महिलेची विवस्त्र करत धिंड काढल्याचा आरोप आला आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. वाळूंज गावात ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह अन्य दोघांवर बीडच्या आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला वडिलांपासून 50 ते 60 वर्षांपासून वाळुंज शिवारातील जमीन त्या कसत आहेत. मात्र रघु, राहुल आणि सुरेश धस या पीडित पारधी कुटुंबाला जमिनीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न आहेत. महिलेचा आरोप आहे की, शेतात काम करत असतांना रघु आणि राहुल यांनी येऊन माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना प्राजक्ता धस यांनी प्रोत्साहन दिलं. याच्यावरून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT