Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: जावयाच्या मिरवणुकीसाठी ग्रामस्थांनी केलं गाढवाला सज्ज...(पहा Video)

अखेर विड्यातील होळीच्या अनोखा उत्सवाला सुरवात

विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावांमध्ये गाढवावरून जावायाची चपलांचा हार घालून वरात काढण्याची परंपरा आहे. तर या मिरवणुकीसाठी ग्रामस्थांनी गाढवाला सज्ज करण्यात आले आहे. तर काही वेळात मिरवणूक उत्सवाला सुरूवात होत आहे. यावेळी गावातील तरुणमंडळी उत्सव साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून डीजेच्या तालावर गावातील तरुणांनी ठेका धरला आहे. दरम्यान गत 90 वर्षाची परंपरा असणाऱ्या या उत्साहाला काही वेळात सुरुवात होत असून गावकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे.

पहा व्हिडिओ-

गेल्या 90 वर्षापासून सुरू असलेली, बीडच्या विडा गावातील धुलीवंदनाची अनोखी परंपरा खंडित होते की काय? अशी शंका निर्माण होत आहे. कारण केज तालुक्यातील विडा गावात, जावयाला गाढवावरून होळीच्या (Holi) दिवशी चपलांचा हार घालून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा जावयाच्या शोधा बरोबरच आता गाढवाचाही शोध गावकऱ्यांना (villagers) घ्यावा लागत आहे.

हे देखील पहा-

मात्र, तरीही काहीही करू पण गाढवाचा (donkey) आणि जावयाचा शोध घेऊन धुलीवंदनाचा उत्सव थाटात साजरा करू म्हणत, गावकऱ्यांनी कंबर कसली आहे. धुलीवंदनाचा उत्सव साजरा करण्यासाठी विड्याच्या ग्रामस्थांची बैठक पार पडली आहे. जावायासह गाढवाच्या शोधासाठी गावकऱ्यांची शोधमोहीम सुरू आहे. विडा गावातील (village) नागरिकांच्या शोधामुळे जावई पसार झाले आहेत. केज तालुक्यातील विडा येथे गेल्या 90 वर्षा पासून जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.

मात्र, गेल्या 2 वर्षांपासून ही परंपरा कोरोनामुळे (corona) बंद ठेवण्यात आली होती. कोरोनामुळे सामाजिक, धार्मिक, राजकीय (Political), जवळपास सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामध्ये विड्याची प्रसिद्ध असणारी धुलीवंदनाच्या दिवशी जावयाला गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यामुळे गेल्या २ वर्षात परिसरातील जावई व घरजावई यांना सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, कोरोना आटोक्यात आल्यानंतर पुन्हा सर्वच कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यात पुन्हा जावई पसार होण्यास सुरुवात झाली आहे.

उद्या शुक्रवारी हा कार्यक्रम सकाळी 11 वा होणार आहे. दरम्यान गावकऱ्यांकडून जावई आणि गाढवाचा शोध सुरू आहे. कोविडच्या 2 वर्षानंतर आता गाढवावरून मिरवणूक काढण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे विडेकरांना आता जावाई आणि गाढव शोधात यश मिळणार का? आणि धुलिवंदनाची 90 वर्षापासून चालत आलेली परंपरा, अखंडित राहणार का? हेचं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT