Beed Zilla Parishad विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: बीडमध्ये जुगार खेळणं शिक्षकांना चांगलाचं भोवलं...

पोलिसांच्या छाप्यात पकडलेले पाच जुगारी मास्तर निलंबित; जिल्हा परिषद सीईओ अजित पवार यांची कारवाई...

विनोद जिरे

बीडमध्ये जुगार खेळणं शिक्षकांना चांगलचं भोवलं आहे. जुगार अड्यावर पडलेल्या छाप्यामध्ये पकडलेल्या अन गुन्हा दाखल झालेल्या, 5 शिक्षकांना जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी, अजित पवार यांनी निलंबित (Suspended) केले आहे. यामध्ये 3 जण जिल्हा परिषदेचे तर 2 जण खाजगी संस्थेचे शिक्षक आहेत. (Beed Latest News)

हे देखील पहा -

28 डिसेंबर रोजी बीड (Beed) शहरालगत एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजप जिल्हाध्यक्षासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या 5 शिक्षकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन दिवसापूर्वी जि.प.प्रशासनाने या शिक्षकांची माहिती मागवून घेतली होती. त्यानंतर काल उशिरा या पाचही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीआहे.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक हरिदास जनार्धन घोगरे रा.नंदनवन कॉलनी बीड, प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष भगवान आश्रुबा पवार,रा.काळेगाव हवेली ता.बीड, भास्कर विठ्ठल जायभाय रा. काकडहिरा ता.पाटोदा, अशोक रामचंद्र सानप, रा.कालिकानगर बीड,बंडू किसन काळे रा.कालिकानगर बीड अशी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. दरम्यान या कारवाईने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Maharashtra News Live Update: पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

SCROLL FOR NEXT