Beed: रेल्वेमध्ये विद्यार्थिनीची छेड काढत विनयभंग विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: रेल्वेमध्ये विद्यार्थिनीची छेड काढत विनयभंग

मुंबई येथील एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकाऱ्याला अटक

विनोद जिरे

बीड: हैदराबाद - हडपसर रेल्वे गाडीमध्ये रात्री विद्यार्थिनीची छेड काढत विनयभंग केल्याची घटना उदगीर -लातूर दरम्यान घडली आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मुंबई येथील एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याला परळी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची आला आहे.

हे देखील पहा -

गुरुवारी रात्री हैदराबाद- हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी व एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना, त्या अधिकाऱ्याने विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या दिनेश चव्हाण याला, औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यात पोलीस घेऊन गेले आहेत. त्यामुळं आता कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोवंशाच्या संरक्षणासाठी लातूरमध्ये रॅली

Sugar Free Tea Recipe: घरच्याघरी बिनसाखरेचा चहा कसा बनवायचा?

मुलीकडून पैशांसाठी तगादा, ७ दिवसांपासून बेपत्ता; टिटवाळ्यातील वयोवृद्ध दांपत्यासोबत काय घडलं? आत्महत्या की घातपात?

भयंकर! धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर चाकू हल्ला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Marathi Actor On Manohar Mama: भोंदू मनोहर मामाचं मराठी टीव्ही इंडस्ट्रीशी कनेक्शन? या मराठमोळ्या अभिनेत्याने केला मोठा आरोप

SCROLL FOR NEXT