एसटी आंदोलन अधिक तीव्र विनोद जिरे
महाराष्ट्र

एसटी आंदोलन अधिक तीव्र; कर्मचाऱ्यांनी सुरू केलं कुटुंबासह आंदोलन...

कुटुंबातील व्यथा सांगतांना शाळकरी मुलीचं मन गहिवरलं...सरकारला केले सवाल

विनोद जिरे

बीड - गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील 11 डेपोमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करा, ही प्रमुख मागणी घेऊन हा संप सुरू आहे. मात्र राज्य सरकार आणि शासन याची दखल घेत नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून कुटुंबासह आंदोलन सुरू केले आहे. बीड बसस्थानकामध्ये कुटुंबासह आंदोलन सुरु आहे. यामध्ये लहान मुलांसह घरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

हे देखील पहा -

यावेळी आपली व्यथा सांगताना आंदोलक मुलगी म्हणाली, की माझे पप्पा एसटी कर्मचारी आहेत. त्यांना केवळ 12 हजार रुपये पगार आहे. दिवाळीसाठी त्यांना अडीच हजार दिले, अडीच हजार रुपयामध्ये आम्ही काय करायचं ? आम्हाला साधे कपडे घेता आले नाहीत, शाळेसाठी लवकर फीस भरता येत नाही, त्यामुळे शिक्षकांचे अनेक वेळा ऐकून घ्यावं लागतं. कधीकधी वर्गाबाहेर देखील थांबावं लागतं. याच मंत्र्यांच्या मुलांसोबत असं झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं? असा संतप्त सवाल कर्मचाऱ्याच्या मुलीने केला आहे.

त्याचबरोबर कमी पगार असल्याने आम्ही खूप मानसिक तानात आहोत. एक गोष्ट सांगताना आम्हाला पप्पांना विचार करावा लागतो. असं देखील मुलगी म्हणाली. तर माझे पती गेल्या 25 वर्षापासून एसटी कर्मचारी आहेत. मात्र आज एवढी महागाई वाढली आहे, की गॅस सिलेंडर एक हजार रुपयाला झाले आहे. भाजीपाला महाग झाला आहे. इतर खर्च आमची दिवाळी पूर्ण अंधारात गेली आहे. त्यामुळे कुटुंब चालवावं कसं? प्रश्न असा आमच्यापुढे आहे. त्यामुळे मायबाप सरकारने आमचं शासनात विलीनीकरण करून घ्यावं, हीच अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही देखील आता आंदोलन करू. असा इशारा देखील आपली व्यथा सांगताना कुटुंबातील सदस्यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

Tiramisu Recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरच्या घरी झटपट बनवा इटालियन डेजर्ट तिरामिसू, वाचा सोपी रेसिपी

उष्माघातामुळे 7 जणांचा बळी, महाराष्ट्राने गाठला तापमानाचा नवा उच्चांक

SCROLL FOR NEXT