Beed Crime  Saam Tv
महाराष्ट्र

आंदोलकाला साथ का दिली? जाब विचारत अजित पवारांचा नेता घरात घुसला, दगड- कोयत्याने कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Beed Police: बीडमध्ये भयंकर घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि गावच्या सरपंचाने घरात घुसून एका तरुणाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. सरपंचासह सहा जणांनी हा हल्ला केला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीये. बीडमध्ये एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. लाठ्याकाठ्या, दगड आणि कोयत्याने घरात घुसून अमानुष मारहाण करण्यात आली. परळीतील जळगव्हाण तांड्यावरील ही घटना आहे. आंदोलकर्त्याला साथ का दिली? असा जाब विचारत घरात घुसून आरोपींनी कुटुंबावर हल्ला केला. आरोपींनी महिलांना देखील सोडले नाही. या हल्ल्यात दोन महिलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील अंगणवाडीसंदर्भात एक तरुण आंदोलन करत होता. आंदोलनकर्त्या तरुणाला साथ का देता? म्हणून कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार परळी तालुक्यातील जळगव्हाण या तांड्यावर घडला आहे. रात्रीच्या सुमारास अजित पवार गटाच्या सरपंचाने त्याच्या सहा सहकाऱ्यांसह अनिल चव्हाण या तरुणाच्या घरी गेले. त्यानंतर त्यांनी घरात घुसून अनिल चव्हाणसह त्याच्या कुटु्ंबीयांना अमानुष मारहाण केली.

सरपंचाने आपल्या सहकाऱ्यांसह अनिल चव्हाणच्या कुटुंबीयांवर काठी, दगड आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. यावेळी त्यांनी तरुणासोबत महिलांनाही मारहाण केली. या हल्ल्यामध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत. अनिल चव्हाण या तरुणाला मात्र किरकोळ दुखापत झाली. पीडित जखमी महिलांवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण होऊन देखील पोलिसांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपी पीडित कुटुंबाने केला आहे. तर पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

Actor Death : जेष्ठ अभिनेत्याचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा

Khushi Mukherjee: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी २५ लाखांची चोरी; घरातीलच व्यक्तीवर संशयाची सूई, पण कुणावर?

फडणवीसांवर राऊतांचा घणाघात; त्यांच्या आणि भाजपच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही; तुमच्या आरशात तुम्ही उघडे Xगडे दिसाल, पैशांसाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली|VIDEO

Agriculture Livestock Scheme: आबा ऐकलं का! सरकार देणार गाई-म्हशी घेण्यासाठी अनुदान, जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT