नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्त बसणार नाही SaamTv
महाराष्ट्र

नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही

नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही; मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्याची मुक्ताफळे

विनोद जिरे

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बदल कोणी चुकीचे बोलत असेल, तर आम्ही सहन करणारे शिवसैनिक नाहीत. त्यामुळे येत्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना मारणार असल्याची मुक्ताफळे, बीडचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी उधळली आहेत.

हे देखील पहा -

विशेष म्हणजे राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या समोर गणेश वरेकर यांनी, जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी फक्त पैसे कमविण्यामध्येच व्यस्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राणेंच्या विरोधी आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित नव्हते. मात्र, आम्ही उद्धव ठाकरे साहेब यांची बदनामी सहन करणार नाहीत आणि येत्या काळात नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना मारणार असल्याचे वक्तव्य केले.

आज मंत्री संदीपन भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेची बैठक झाली. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने शिवसेनेतील गटबाजीचे दर्शन देखील मंत्र्यासमोरचं पाहायला मिळाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT