Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : जीवाची भीक मागितली, हात जोडून गयावया केलं; बीड हादरवणारा आणखी एक व्हिडिओ समोर

Beed Latest News : बीड हादरवणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. शिवराज दिवटे याने तरुणांकडे जीवाची भीक मागितली.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर आता बीडच्या परळीत शिवराज दिवटे या तरुणाला भयंकर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे.

बीडच्या परळीत शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण जमीनीवर पाडून जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करताना त्याला माफी मागायला सांगितली. मारहाणीच्या घटनेने बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवराज दिवटेने या प्रकरणी पोलिसांतही तक्रार दिली आहे. अखंड हरिमान सप्ताहावरून परतत अशताना शिवराजला १० ते १५ लोकांच्या टोळक्यांनी मारहाण केली. शिवराजला रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेऊन मारहाण करण्यात आली. या शिवराजला मारहण करतानाचा आता दुसरा व्हिडिओ समोर आला आहे.

शिवराजने मागितली जीवाची भीक

शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर बीडच्या गुन्हेगारीचा पुन्हा एकदा चेहरा समोर आला. या व्हिडिओनंतर वेगवेगळे व्हिडिओ समोर आले. शिवराजची कॉल रेकॉर्डिंग समोर आली. मात्र आता दुसरा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहेय. तुझ्यासोबत कोण कोण होतं? कोणी कोणी मारलं? त्यांची नाव सांग, तुला कोयत्याने तोडू, असे म्हणत तरुणाला बेदम मारहाण करतानाचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. परळी शहरातील जलालपूर भागातील ही धक्कादायक घटना आहे. शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण करतानाचा दुसरा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

कराड कनेक्शन समोर

'काही लोक माझ्या मदतीला आले. त्यांनी मला टोळक्याच्या तावडीतून सोडवलं. त्यामुळे त्या पोरांनी मला जिवंत सोडलं नसतं. त्यांना आता कठोर शिक्षा व्हायला हवी, असे शिवराज दिवटे म्हणाले. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर तीन ते चार जणांचा शोध सुरु आहे. मारहाण करणारे तरुण कराड गँगशी संबंधित असल्याचे म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT