Beed Crime Satish Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale : निर्दयी खोक्या भोसलेचा आणखी कारनामा, २०० काळवीट, शेकडो हरणं अन् ससे आणि मोरांचा घेतलाय जीव

Satish Bhosale News : आष्टी शिरूर आणि पाटोद्यामध्ये सतीश भोसलेची खोक्या पार्टी गोल्डमॅन अशी ओळख आहे. या पद्धतीने हा सतीश भोसले माणसांना मारतो, त्याच पद्धतीने त्यांनी मुक्या प्राण्यांचे देखील अनेक जीव घेतले आहेत.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद

बीड : निर्दयी स‍तीश उर्फ खोक्या भोसलेने हजारो मुक्या प्राण्यांचा जीव घेतला आहे. माणसांना अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले याचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहे. हरीण, काळवीट, ससे आणि मोर या मुक्या प्राण्यांचे खोक्याने जीव घेतला आहे. पण आतापर्यंत वनविभाग किंवा पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही नोंद नाही. सतीश उर्फ खोक्या भोसले मुक्या प्राण्यांचे जीव कोणाच्या आशीर्वादाने घेत होता? शंभराहून अधिक हरणांचा जीव घेतला आहे. बीडचं वनविभाग करतय काय सतीश भोसले वरती वनविभाग का मेहरबान? असा सवाल उपस्थित होतोय.

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील ढाकणे कुटुंबांना अमानुषपणे सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. या घटनेचे मारहाणीचे व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाल्यानंतर हा सतीश भोसले नेमका आहे तरी कोणाशी चर्चा सुरू झाली. याच सतीश भोसलेचे जुने कारणामे आता समोर येऊ लागले आहेत. आष्टी शिरूर आणि पाटोद्यामध्ये सतीश भोसलेची खोक्या पार्टी गोल्डमॅन अशी ओळख आहे. या पद्धतीने हा सतीश भोसले माणसांना मारतो, त्याच पद्धतीने त्यांनी मुक्या प्राण्यांचे देखील अनेक जीव घेतले आहेत. यामध्ये , काळवीट, ससे आणि मोर या प्राण्यांचा समावेश आहे.

या मुक्या प्राण्यांना संपवण्याचे काम सतीश भोसले आणि त्याच्या गँगने केले आहे. भोसलेने आतापर्यंत शंभरहून अधिक हरणांचा जीव घेतला आहे, तर ससे काळवीट यांचा देखील मोठ्या प्रमाणात जीव त्यांनी घेतला आहे. यामध्ये जवळपास 200 हून अधिक ससे त्यांनी मारले आहेत. तर या सतीश भोसलेनी जवळपास दीडशे काळवीट मारले आहेत, तर जो मोर प्राणी आहे, त्या मोरांचे देखील या सतीश खोक्या भोसलेने जीव घेतले आहेत. गायरान जमिनीमध्ये जाळे लावून त्यांना जाळ्यात पकडायचे आणि गलोरीच्या साह्याने त्यांचा जीव घ्यायचाचे उद्योग सतीश भोसलेच्या आशीर्वादाने त्याची गँग करत आहे.

सतीश भोसलेने हजारो प्राण्यांचे जीव घेतले आहेत, त्याची कुठे नोंद नसल्याचे समोर आले आहे. वन विभाग करतंय काय? वन विभागाला याची माहिती कशी नाही, हे देखील आता शंका निर्माण झाली आहे. मात्र ज्या सतीश भोसलेने महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे यांना अमानुषपणे मारहाण केली, त्याच सतीश उर्फ खोक्या भोसलेने अनेक कारणामे केल्याचा समोर आली आहे.

सतीश उर्फ खोक्या भोसलेने किती मुक्या प्राण्यांचा घेतला जीव.

1) सतीश उर्फ खोक्या भोसले ने आष्टी शिरूर आणि पाटोदा परिसरातील शंभरहून अधिक हरणांचा घेतला जीव.

2) याच निर्दयी खोक्या भोसलेने जवळपास 200 काळविटांचा आतापर्यंत जीव घेतला आहे.

3) आष्टी पाटोदा शिरूर या गायरान परिसरामध्ये सतीश भोसले ने जवळपास 200 हून अधिक सश्यांचा देखील जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

4) सतीश भोसले ने जवळपास 50 हून अधिक मोरांचा देखील जीव घेतला आहे.

5) बीडचं वनविभाग करताय काय सतीश भोसले वरती का आहे वनविभाग मेहरबान?

6) सतीश भोसले ला हे करण्यासाठी कोणाचा आशीर्वाद परिसरामध्ये चर्चा.

7) निर्दयी सतीश उर्फ खोक्या भोसले वरती आणि त्याच्या गँग वरती कार्यवाहीची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT