Santosh Deshmukh Murder Case MLA Suresh Dhas Cheating Saam Tv News
महाराष्ट्र

'पैसे दिले, वाट पाहिली, पण...; आमदार धसांची फसवणूक, कृष्णा आंधळेला आणण्यासाठी पैशांची मागणी

MLA Suresh Dhas Cheated : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तब्बल गेल्या ८० दिवसांपासून फरार आहे आणि पोलीस शोध सुरू आहे. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.

Prashant Patil

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अजूनही यश मिळालं नाही. मात्र कृष्णा आंधळेसाठी आमदार सुरेश धसांना ५ हजारांचा गंडा घालण्यात आलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे? आणि धसांना गंडा कसा घातला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तब्बल गेल्या ८० दिवसांपासून फरार आहे आणि पोलीस शोध सुरू आहे. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. कृष्णा आंधळेला घेऊन येतो, असं सांगून बारगजे नावाच्या व्यक्तीने आपल्याला गंडा घातल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय. तर कृष्णा आंधळे छत्रपती संभाजीनगरमध्ये लपल्याचं सांगत खासदार बजरंग सोनवणेंचीही फसवणूक केली असल्याचं समोर आलंय. या बारगजेने धसांना कसा गंडा घातला? पाहूयात.

कसा घातला धसांना गंडा?

बारगजे नावाच्या व्यक्तीचा आमदार सुरेश धसांना फोन

आंधळेला कॅबमधून आणण्यासाठी बारगजेकडून पैशांची मागणी

धसांनी बारगजेला ५ हजार पाठवले

आपल्याला साडेचार तास अहिल्यानगरमध्ये उभं रहावं लागल्याचा दावा

त्यानंतर धसांनी पोलीस अधीक्षकांना फोन केला

पोलीस अधीक्षकांनी आपलीही फसवणूक झाल्याचं सांगितलं, असा धसांचा दावा

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातून वेगवेगळ्या प्रकारचा लाभ उठवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असल्याचं धसांनी म्हटलं आहे. धसांना गंडा घालणाऱ्या बारगजे या व्यक्तीचा माग पोलीस काढत आहेत. मात्र आमदार आणि पोलीस अधीक्षक यांचीच जर अशी फसवणूक होत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील? याची फक्त कल्पनाच केलेली बरी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT