बीड : 'जलयुक्त शिवार' घोटाळ्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह; कोर्टाचे फेरतपासाचे आदेश SaamTvNews
महाराष्ट्र

बीड : 'जलयुक्त शिवार' घोटाळ्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह; कोर्टाचे फेरतपासाचे आदेश

बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालाय. परळी पोलीसात कंत्राटदार आणि अधिकारी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार (Jalyukta Shivar) योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालाय. परळी पोलीसात कंत्राटदार आणि अधिकारी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील अधिकाऱ्यांविरुध्दच्या गुन्ह्यात पोलीसांनी दोषारोप पाठविले होते, मात्र कंत्राटदारांविरुध्दचा (Contractor) गुन्हा सी समरी' देत बंद केला होता. मात्र, पोलीसांचा हा सी-समरी अहवाल न्यायालयाने फेटाळला असून या प्रकरणात फेरतपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं आर्थिक गुन्हे शाखेला हा मोठा धक्का आहे.

हे देखील पहा :

या जलयुक्तच्या एका गुन्ह्यात अधिकारी कर्मचारी तर दुसऱ्या गुन्ह्यात कंत्राटदार आरोपी होते. तर या घोटाळ्यातील आरोपी हे सर्वच पक्षांशी संबंधित असल्याने, हे गुन्हे (Cases) दाखल होण्यास देखील उशीर लागला होता. तर हे गुन्हे दाखल झाल्यानंतर सदर गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. यातील अधिकाऱ्यांविरुद्धच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र पाठविण्यात आले. मात्र कंत्राटदारांविरुद्धच्या गुन्ह्यात, पोलीस कंत्राटदारांवर उदार झाले आणि सदर प्रकरणात पोलिसांनी ' सी समरी अहवाल ' न्यायालयात (Court) पाठवून प्रकरण बंद केले.

यामुळं साऱ्याच कंत्राटदारांना अभय मिळणार होते. विशेष म्हणजे जिथे पोलीस (Police) सदर गुन्हा चुकीच्या तथ्यांच्या आधारे दाखल करण्यात आला होता. असा अहवाल देऊन कंत्राटदारांना वाचवू पाहत आहेत, तिथे कृषी विभाग मात्र दोषी कंत्राटदारांच्या मालमत्तेवर बोजे चढविण्यासाठी महसूल विभागाकडे पत्रव्यवहार करीत आहे. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशाने पोलीसांना मोठा धक्का बसला असून आर्थिक गुन्हे शाखेने दिलेला सी-समरी अहवाल न्यायालयाने फेटाळला आहे. तर या प्रकरणात पुन्हा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले असल्याने घोटाळेबाज गुप्तेदार आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट; समस्या सोडवण्याचे आश्वासन

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT