Raj Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Beed Politics: मनसेचं ठरलं! बीडसह परळी विधानसभा निवडणूक लढवणार; जिल्हाध्यक्षांची माहिती

Beed News: एकीकडे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत असतानाच बीडमध्ये मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.

विनोद जिरे

Beed Politics News:

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत असतानाच बीडमध्ये मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.

बीडमध्ये (Beed) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. बीड, परळी विधानसभेसह जिल्ह्यातील अन्य विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही ताकतीने लढविणार आहे. अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.. तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देखील मनसे मैदानात आहे.

बीड शहरासह जिल्ह्यातील विकास कामांच्या मुद्द्यावरून मनसे निवडणूक रिंगणात येणार असल्याची माहिती देखील धस यांनी दिली. आज बीड शहरासह जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे, पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागतेय, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, मात्र याकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. त्यामुळेच या मुद्द्यावरून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. असे देखील सुमंत धस म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र मनसे - भाजप युतीचा अद्याप कोणताही फाॅर्म्युला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच मनसे- भाजप युती होऊ शकते का? यावर राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र कोणाताही फाॅर्म्युला अद्याप नसल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT